इंग्रज विरोधातले पहिले प्रतिसरकार स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न उमाजी नाईकांनी केला होता            

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

⭕ विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या उमाजी नाईक स्मृतीव्याख्यानात कॉ.मारुती शिरतोडे यांचे प्रतिपादन

भारताच्या सव्वाशे वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यातील पहिले इंग्रज विरोधातले प्रतिसरकाfर स्थापन करण्याचा पहिला प्रयत्न एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या प्रर्वात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी केला होता असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य पदाधिकारी कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी ऑनलाइन व्याख्यानमालेत केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र या संघटनेने आयोजित केलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ऑनलाइन स्मृती व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाज विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजय माने होते.यावेळी बोलताना कॉम्रेड मारुती शिरतोडे म्हणाले की आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे एकंदर चार टप्पे पडतात त्यातला पहिला टप्पा१८१८ ते१८५७ पर्यंतचा होता तर दुसरा टप्पा १८५८ ते १८८५ पर्यंतचा होता तिसरा टप्पा १८८६ते १९२९ पर्यंत चा होता आणि चौथा व अखेरचा टप्पा १९२१ ते १९४७ पर्यंतचा होता. अशा चार टप्प्यात लढलेल्या स्वातंत्र्याच्या लोकलढ्यात १८१८ ते १८३२ या कालखंडात सतत चौदा वर्षे ब्रिटिश कंपनी सरकार विरोधात तिव्र लढा उभारणारा व सातारा, पुणे ,अहमदनगर,भूम परांडा ते तळकोकणापर्यंत विस्तारित भागात इंग्रज विरोधी प्रतिसरकार निर्माण करण्यासाठी मोजक्या सैन्यानिशी प्रखर लढा उभारला होता.या क्रांतीवीरास पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याकाळात दहा हजार रूपये रोख व चारशे बिघा जमिन एवढे मोठे बक्षिस जाहीर केले होते. उमाजी नाईकांचा संघर्ष हा पेशवा आणि इंग्रजा बरोबर जसा होता तसाच इथले धनदांडगे ,सावकार,व इंग्रजांचे हस्तक यांच्याशी होता. डोंगर दर्‍यात राहणारा, जंगलवाटा तुडवणारा, शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गनिमी काव्याने इंग्रजांच्या अनेक पलटणीना सतत हुलकावणी देणारा उमाजी नाईक फंदफितुरी ने पकडला गेला. उमाजी नाईकांना पकडण्यासाठी नेमलेल्या अनेक इंग्रज अधिकारी पैकी मुख्य असणारा कॅप्टन मॉकीटॉश याने कंपनी सरकारला दिलेल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की जर उमाजी पकडला गेला नसता तर तो दुसरा छत्रपती शिवाजी राजा ठरला असता. अशा या आद्यक्रांतिवीरास ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्यात मामलेदार कचेरी समोर फाशी देण्यात आले. हुतात्मा उमाजी नाईक हे स्वातंत्र्यलढ्यातील पहिले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ठरले.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा डॉ. विजय माने यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व बहुजन समाजातील उपेक्षित क्रांतिकारकांचे कार्य नवीन पिढीसमोर आदर्श म्हणून उभा करणं यासाठी मोठ्या प्रमाणात पुरोगामी चळवळीनी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या स्मृती व्याख्यान मालेचे स्वागत सातारा येथील पत्रकार विजय मांडके यांनी केले. प्रास्ताविक व वक्ते परिचय विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी केले. आभार शुभम टाले यांनी मानले. या व्याख्यानास महाराष्ट्र भरातून चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *