उठा जागे व्हा!! सर्वसामान्य जनतेसह समाज सेवक पत्रकार बंधु जागे व्हा!!!

By : Raganath Deshmukh

कडू आहे पण सत्य आहे कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यापासून राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक कोरोना रुग्ण वैद्यकीय सेवा अभावी प्राणाला मुकले जसजसा प्रादुर्भाव वाढत गेला तसतसे विविध माध्यमाच्या अंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रात कोरोणा वर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा व नेतेमंडळी यांनी अति दक्षता घेण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनेक प्रकरणे दृष्टीस आणून दिली पण आजची स्थिती डोळस आहे, डावाडोल आहे .

काही दिवसा अगोदर अंबुजा माणिकगड अल्ट्राटेक दालमिया या कंपनीच्या व्यवस्थापनाशी बोलणी करून गोंडपिंपरी राजुरा कोरपना जिवती गडचांदूर येथील कोवीड सेंटरमध्ये आरोग्यव्यवस्था पुरवणे विषयी प्रसारमाध्यमामधून अनेक दिग्गजांनी आपापली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला, पण अजून पर्यंत या कंपनीचा सीएसआर फंडातून कुठे ऑक्सिजन व्यवस्था आरोग्य व्यवस्था पुरवल्या गेली यावर प्रश्नचिन्ह आहे,

आमदार खासदार पालकमंत्री माजी पालकमंत्री यांनी केलेली वादे बेवफाई झाली ,जर वचनपूर्ती करायची नव्हती तर आशा कशाला दाखवायची

गोंडपिंपरी येथील तृतीय पंथी भगिनींनी प्रखर आवाजात हा प्रश्न मांडला नगरपंचायत जिवती पंचायत समिती जिल्हा परिषद पुढार्‍यां मार्फत परिसरात होणाऱ्या कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलण्यात आले नाहीत, प्रत्येक गावात ग्रामसेवक सरपंच या माध्यमाने कोविड सुविधा पुरवण्या विषयी सूचना देण्यात आल्या पण त्याचाही खेळखंडोबा होताना दिसतोय. याची सर्व माहिती मनसेचे राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंठाळे, कोरपना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, राजुरा मनसे तालुकाध्यक्ष राजू गडमवार ,जीवती मनसे तालुकाध्यक्ष शेख हक्कानी, मनसे जीवती महिला तालुका अध्यक्ष शिवगंगा मठपती सर्वसामान्य जनतेसमोर ठेवीत आहे.

सन्माननीय साहेबांनी चंद्रपूर जिल्ह्यात 200 ऑक्सिजन कासीस्टेटर देण्याची घोषणा केली पण यातही जीवती तालुक्याला वगळण्यात आलं यावर कोणत्याही माजी आमदार आणि खासदार प्रश्न का निर्माण केला नाही? राज साहेब सांगतात तेच खरं यांना तुमची किंमत फक्त मतदान पुरती आहे मतदान संपलं की यांच्यासाठी सर्वसामान्य जनता कवडी मोलच का??
किराणा भाजीपाला यासाठी सात ते अकरा ची वेळ दिलेली आहे त्या दरम्यान प्रचंड गर्दी बाजारात होताना दिसते सदर वेळ वाढवून दिल्यास अथवा योग्य ते नियंत्रण केल्यास कोररोना चा प्रादुर्भाव थांबण्यास मदत होऊ शकते, हे मान्य आहे साहेब , बाकी इतर मोलमजुरी करणारा वर्ग रिक्षावाले फुटपाट वरील छोटे व्यावसायिक आर्थिक परिस्थितीत जखडल्या जात आहेत ,मागील वर्षापासून सतत कोरोणामुळे व्यवसाय ठप्प झाले असून लॉक डाऊन च्या दरम्यान पूर्णपणे बंदोबस्त पाळत असताना बँकांची कर्ज हप्ते ,गाडीचे हप्ते, लाईट बिल ,प्रत्येक दुकानात नोकरदार वर्ग यांना पगार, कुठून द्यायचा ??शाळेची फी कशी भरायची?? घरखर्च कसा चालवायचा?? या प्रश्नांचा कधी विचार येत नाही का हो तुम्हाला? येत असेल तर कृपया यावर विचार करा कुंभकर्णाच्या झोपेतून जागे व्हा !फोटो काढण्यात पुरते किंवा पब्लिक सीटी स्टंट म्हणून आपल्याच प्रसार माध्यमातून तुम्ही करत असलेल्या वचनाची पूर्तता होत नाहीये ,वचन तेच द्या साहेब जे तुमच्या ने पूर्ण करन होईल, उगीच सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ खेळू नका

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *