

लोकदर्शन 👉 रंगनाथ देशमुख
⭕200 ऑक्सिजन काॅसीस्टेटर च्या यादीत जीवतीचे नावच नाही !!
—————————-‘————
जिवती ÷ऑक्सिजन अभावी जिल्ह्यातील कोरोना पेशंटची होत असलेली दैन्यावस्था पाहून सन्माननीय साहेबांनी 200 ऑक्सिजन काॅसस्टेटर ची व्यवस्था केली हे ऐकताच विश्वासाने समाधानाची सूटका सोडली ,पण विभाजनाची यादी पाहता जीवती तालुक्याचा कोणी वाली आहे का नाही हा प्रश्न खदखदू लागला ,
अपुरी आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम प्रशासन प्रशासनाच्या आणि नेत्याच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ब्रह्मपुरी 30, सावली 15,
शिंदेवाई 15 ,भद्रावती,गडचांदू15, 15 ,मुलसाठी 15 ,वरोरा 15 ,चिमूर 10, नागभीड 10 ,बल्लारशहा 15, चंद्रपूर 30 ,अशाप्रकारे दहा लिटर क्षमतेचे दोनसे 200 ऑक्सीजन कोंसीस्टेटर उपलब्ध करून दिले पण जीवतीसाठी एकही ऑक्सिजन काॅसीस्टेटर देऊ वाटले नाही का??
तालुक्याच्या कोवीड सेंटरला सावत्रपणाची वागणूक का?? साहेब जिवती तालुका ही चंद्रपूर जिल्ह्यातच येतोना नगरपंचायती सगट जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर बडे नेते याबाबत का बोलत नाहीत ??
मग प्रश्न उद्भवतो जिवती तालुक्याचे पालक मंत्री कोण असा प्रखर प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी उपस्थित करून सदर प्रकरणात तात्काळ लक्ष देऊन जिवतीलाही ऑक्सीजन काॅसीस्टेटर उपलब्ध करून द्यावी ही विनंती केली आहे