विद्येला विनयतेची जोड असणे गरजेचे असे प्रतिपादन दिपक महाराज पुरी यांनी केले.

By : Shankar Tadas

श्री. व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथे आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून वरील प्रतिपादन दिपक महाराज पुरी यांनी केले . मनुष्याने उच्चत्तम शिक्षण घेतले पाहिजे परंतु त्या शिक्षणासह विनयता सुद्धा अंगिकारली पाहिजे अन्यथा मनुष्य रानटी व गर्वीश्ठ बनतो जे समाजाकरीता घातक ठरतील. विद्यार्थी समाज उपयोगी असायला पाहिजे असे विचार संस्थेचे कोषाध्यक्ष मा. दीपक महाराज पुरी यांनी मांडले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अंजना ताई पवार सभापती पंचायत समिती जिवती यांनी कठीण परिश्रम करून उज्वल भविष्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे असे सांगितले या प्रसंगी प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी महाविद्यालयाचा वार्षिक लेखाजोखा व प्रगती बदल बरीचशी माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक मा. नाना साहेब देशमुख, विठ्ठल महाराज पुरी यांनी सुध्दा महाविद्यालयाच्या यशा संदर्भात प्रकाश टाकला. विदर्भ महाविद्यालय जिवती हे सदैव विद्यार्थी हित लक्षात घेऊन कार्य करतात व येथील विद्यार्थी हे समाज उपयोगी कार्य करण्यास नेहमी तत्पर असतात. असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात कला व विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला त्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राऊत यांनी केले तर आभार प्रा डॉ. पानघाटे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला व महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ यशस्वी रित्या संपन्न झाला.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *