विठ्ठल मंदिर परिसरात होलिका पूजन : कचऱ्याची केली होळी

By : Shankar Tadas 

गडचांदूर :कोरोना मुळे सर्वत्र हाहाकार माजला असून संपूर्ण देशात एक वर्षापासून सर्व काही ठप्प झाले आहे, ऐन होळी च्या पर्वावर सुद्धा लाकडाऊन चे संकट आहे, कोरोना पासून लवकर मुक्ती मिळावी व जनतेला गत वैभव प्राप्त व्हावे, निरोगी व उत्त म आरोग्य लाभावे ही मागणी विट्ठल मंदिर सेवा समिती तर्फे करण्यात आली, विट्ठल मंदिर परिसरात होलिका पूजन व दहन प्रसंगी प्लास्टिक ,कचरा, गुटखा,या सह कोरोना च्या प्रतिमेचे सुद्धा दहन करण्यात आले, या वेळी ह भ प दिपक महाराज पुरी, नगरसेविका मीनाक्षी अशोक एकरे, प्रा संगीता उध्दव पुरी, रश्मी मोहन भारती, अशोक एकरे, उध्दव पुरी,यांच्या उपस्थितीत होळी पेटविण्यात आली, कोरोना नियमांचे पालन करीत गर्दी टाळण्यात आली व उपस्थितांनी मास्क लावून होलिका पूजन केले, त्यानंतर आरती करून सर्वांना निरोगी आरोग्य लाभावे अश्या शुभेच्छा देण्यात आल्या,या प्रसंगी माजी सरपंच शिवकुमार राठी, बंडू एकरे, सुनील ठाणेकर, मेघराज एकरे, वसंता कोगरे, विनोद मोगरे, सह परिसरातील नागरिकांनी अभिनव उपक्रमात सहभागी होऊन होलिका पूजा केली.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *