महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ नुकताच संपन्न..!

 

लोकदर्शन 👉मुंबई सेंट्रल (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

मुंबई , दि- ३ मुंबई सेंट्रल येथे बी.आय.टी चाळ परीसरात असलेल्या गेली ८६ वर्षे सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महात्मा स्पोर्ट्स क्लब (रजि.) या संस्थेच्या व्यायाम शाळेच्या नुतनीकरणाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांच्या हस्ते करण्यात आला .याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुधीर गावडे , प्रमुख पाहुणे नगरसेवक राजेंद्र नरवणकर , समाजसेवक दिपक अंकलेश्वरीया , जगदिश सोळंकी , सिनेदिग्दर्शक-पत्रकार महेश तेटांबे , ज्येष्ठ पत्रकार शिवदास शिरोडकर , पत्रकार मिलिंद आरोलकर, माजी नगरसेवक अरविंद बने उपस्थित होते . राजेंद्र लकेश्री यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या ८६ वर्षाच्या कारकीर्दीचा थोडक्यात परीचय उपस्थितांना करवून दिला .उपस्थित मान्यवरांचा शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . त्यांचे मार्गदर्शन उपस्थित तरुण वर्गाला लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सरचिटणीस महादेव लेपकर तसेच सुरेश जाधव , नथुराम खोत , सुरेश कणसे आदींनी परीश्रम घेतले .

धन्यवाद
महेश्वर तेटांबे
पत्रकार
९०८२२९३८६७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *