महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय सांगली व ग्रामपंचायत आटपाडी। चा संयुक्त ,जनजागृती कार्यक्रम साजरा                           

लोकदर्शन 👉


आटापाडी ÷ यांचे संयुक्त विद्यमाने आटपाडी ग्रामपंचायत च्या प्रांगणात शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार तसेच कोरोणा आजार जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार व वरदान उद्योग समूहाचे संचालक ॲडवोकेट श्री. धनंजय लक्ष्मणराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब मेटकरी, श्री. प्रकाश मरगळे, बलवडी तालुका सांगोला येथील प्रगतशील बागायतदार श्री. सचिन दुर्योधन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते श्री. रविकांत लांडगे, श्री. विजय लांडगे, श्री सुखदेव पाटील, श्री. विकास भानुदास पाटील, श्री. प्रदीप लिंगे, श्री. आकाश लिंगे, श्री. दादा लिंगे, श्री. अशोक बालटे,
व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध शाहिर डॉक्टर श्री. अमोल जयवंत रणदिवे दिघंचीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या शाहिरी लोककलेतुन जनसमुदायाला समजावुन जनजागृती केली.
दिनांक 3 फेब्रुवारी २०२२

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *