वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी”

By : Mahadev giri

वालुर : वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उतसाहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी सौ.एस. आर. सोनवणे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एस. डि.भोकरे, बि.व्हि.बुधवंत, जि.एम. कावळे, व्हि.एन.बोंडे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या वेळी शालेय विद्यार्थीनी सेजल भोकरे, शारदा गिरी, आकांक्षा भोकरे, आकाश गडदे,विशाल चाकोते,विक्रम शिंदे व इतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.डि.भोकरे, बि.व्हि.बुधवंत, जि.एम.कावळे आदिंनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चारीतऱ्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता दहाविच्या विद्यार्थीनी कु.संध्या जिवणे, कु.वैष्णवी जिवणे यांनी केले तर आभार कु.राणी सोनवणे हिने मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *