

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गेल्या एक वर्षांपासून विद्यार्थी भारती संघटना ही मोहीम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जाऊन गावागावातील तरुणांना एकत्रित करून जनजागृतीच्या माध्यमातून राबवत आहे. समाजात पाळले जाणारे विविध भेदभावाच्या रुढी परंपरा मोडीत काढण्यासाठी एक 22 वर्षीय तरुणी सरसावली आहे. धर्मभेद ,जातीभेद ,वर्णभेद, वंशभेद, वर्गभेद, लिंगभेद , गरीब श्रीमंत, काळा गोरा या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाला माणूस म्हणून स्वीकारावे, माणूस म्हणून वागवावे यासाठी आजच्या तरुणांना एकत्र येऊन फुले शाहू गांधी आंबेडकर या महामानवांचा वारसा घेऊन एक नवी पिढी घडवण्यासाठी आज विद्यार्थी भारती संघटनेचे कार्यकर्ते प्राण पणाला लावून लढत आहेत असे विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा जया गणाई यांनी सांगितले.
आजच्या तरुणांना पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक भान व त्याप्रति आपल्या कर्तव्यांबद्दल जागरूक करणे हे देखील देखील महत्वाचे आहे . उपोषण करून परिवर्तन घडवणे हा गांधीमार्ग आहे. शांततेच्या व अहिंसेच्या मार्गाने आपण काय करू शकतो ह्याचे उत्तम उदाहरण महात्मा गांधींनी जगासमोर ठेवले आहे. आणि आजही हे शक्य आहे असा आमचा विश्वास आहे असे विद्यार्थी भारती राष्ट्रीय सचिव प्रणय घरत यांनी सांगितले.
धुळ्यातील बेहेड जवळील दारखेल, नाडास, छाईल, कासारे, नवडणे, अश्या विविध गावांमधून या मोहिमेला पाठिंबा मिळाला असून ह्या गावांमधून अनेक तरुण ह्या मोहिमेत सामील होण्यास उत्सुकता दाखवली आहे.असे विद्यार्थी भारती मुंबई अध्यक्ष व या कार्यक्रमाच्या कार्यक्रम प्रमुख अंजली वाघ यांनी सांगितले.
-संपर्क
8104571787