

लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते राजुरा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. साईनगर येथे वाढीव पोल च्या कामाचे भुमीपुजन तसेच संविधान चौक राजुरा येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, स्वच्छता व आरोग्य सभापती आनंद दासरी, नगरसेवक गजानन भटारकर, नगरसेविका तथा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष संध्या चांदेकर, नगरसेविक दिपा करमनकर, अब्दुल माजिद कुरेशी, अॅड चंद्रशेखर चांदेकर, विनोद निमसटकर, योगिता मटाले यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.