इकार्निया पासून हस्तशिल्प निर्मिती प्रशिक्षणातून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे.

By : Mohan Bharti

राजुरा नगरपरिषद आणि अजय बहुदेशिय संस्था भद्रावतीचा संयुक्त उपक्रम.

राजुरा  :– माझी वसुंधरा अभियान, मेरा शहर मेरी पहचान महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग च्या दिनांक 14 ऑक्टोम्बर 2020 च्या शासन निर्णय अन्वेय संपूर्ण राज्यात दिनांक 2 ऑक्टोम्बर 2020 “माझी वसुंधरा” या अभियान अंतर्गत पृथ्वी, जल, वायू ,अग्नी, आकाश या पंचत्वावर पर्यावरण विषयक मानवी स्वभावातील बदलासाठी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने नगरपरिषद राजुरा व अजय बहुदेशिय संस्था भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने नगर परिषद राजुरा समोरील ऐतिहासिक मालगुजारी तलावातील उपद्रवी वनस्पती जलकुंभी इकॉर्निया पासून हस्तशिल्प तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मागील बऱ्याच महिन्यापासून या तलावात जलकुंभी इकार्निया वनस्पतीची वाढ मोठ्या प्रमाणत होत असून पाण्याच्या प्रदूषणात वाढ होऊन तलावाचे नैसर्गिक सोंदर्य नष्ट होते आहे. स्वच्छ राजुरा सुंदर राजुरा या उद्देशाने जीव ओतून काम करणारे राजुराचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी पुढाकार घेऊन अजय बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून येथील इकार्निया वनस्पती पासून हस्तशिल्प निर्मिती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन क्रीडा संकुल राजुरा येथे असुन या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकरी सूर्यकांत पिदूरकर, अजय बहुदेशीय संस्थेच्या अध्यक्षा स्वाती धोटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती आनंद दासारी, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू तसेच सर्व समित्यांचे सभापती, सर्व नगरसेवक, अजय बहुद्देशीय संस्थेचे महेश सर व सर्व सदस्य, प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
या आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे राजुरा शहर तलावातील एकोर्निया च्या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यास नगर परिषद राजुरा आणि अजय बहुदेशीय संस्था* यांना यश आले आहे. तसेच या पासून महिला बचत गटांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मित करणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. निरोपयोगी एकोर्निया वनस्पतीचे वापर करून जे निरनिराळे हस्तशिल्प तयार करण्यात आले त्याची प्रदर्शनी लवकरच नगर परिषद राजुरा कार्यालय परिसरात लावण्यात येईल आणि विक्री करिता ते खुले करण्यात येईल. येणाऱ्या काही दिवसात राजुऱ्यातील या तलावास त्याचे नैसर्गिक सोंदर्य पुन्हा प्राप्त करून दिल्या जाईल असे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले आहे. तसेच शहरातील अधिकाधिक महिलांनी व जनतेने सुद्धा सदर कार्यक्रमांत सहभागी व्हावे आणि आपले राजुरा शहर स्वच्छ, सुंदर, सदाहरित बनविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *