देशाचे माजी पंतप्रधान भापजा चे उगमस्थान श्रद्ध्येय अटलजी यांच्या जयंती निमित्त गोवरी येथे श्रमकार्ड केंद्र सुरू.

. लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

  • ⭕सभापती सुनील उरकुडे यांच्या प्रयत्नातून सेवा सुरू
    आज 25 डिसेंबर म्हणजे श्रध्ये य अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस भाजपा मध्ये असलेल्या परंपरे नुसार प्रेरणादायी व्यक्तींचा वाढदिवस जयंती जनतेची सेवा करून साजरा करणे असल्याचे ध्यानात ठेवत जी प चंद्रपूर चे कृषी पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी आज सुशासक माजी प्रधानमंत्री अटलजींच्या जयंती निमित्त गोवरी वासीयांनी सोयीचे व्हावे म्हणून गावातच केंद्र सरकार द्वारा संचालित श्रम कार्ड केंद्र स्वतःच्या जनसंपर्क कार्यालयातच सुरू करून जनतेला सुविधा उपलब्ध करून दिली आज जयंती दिनानिमित्य अटलजींच्या प्रतिमेला पुष्प वाहून पूजन केले व फीत कापून सेवाकेंद्राचे उदघाटन करण्यात आले व त्वरित कार्ड तयार करण्याच्या मोहिमेला सुरुवात करून काही लाभार्थ्यांना कार्यकर्मप्रसंगी कार्ड वाटप सुद्धा करण्यात आले
    त्याप्रसंगी सभापती उरकुडे यांनी मोदी सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांची माहिती उपस्थितांना करून दिली
    कार्यक्रमाला माजी सरपंच सौ पौर्णिमा उरकुडे,ग्रा प सदस्य शंकर बोढे, विठ्ठल चिंचोलकर,विठ्ठल दरेकर, हर्षल वनकर, मनोज उरकुडे,गजानन बोढे,मयूर उरकुडे, मनीषा जमदाडे,बरूला टेकाम, गीता आत्राम,अनिता उरकुडे आदी नागरिक उपस्थित होते.
लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *