पालकमंत्री, खासदार, आमदार यांची 17 डिसेंबर ला कोरपना येथे जाहीर प्रचार सभा

,लोकदर्शन 👉मोहन भारती,

कोरपना,,
कोरपणा नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ *मा.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार* (मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर,) *मा.श्री. बाळूभाऊ धानोरकर*( खासदार चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्र,)*मा. श्री. सुभाषभाऊ धोटे* (आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र ) यांची जाहीर प्रचार सभा 17 डिसेंबर ला दुपारी 1 वाजता कोरपना येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित केली आहे,

कोरपना तालुक्यातील समस्त काँग्रेस कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, युवक काँग्रेस,चे कार्यकर्ते निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार, कोरपना तालुक्यातील विविध विभागाचे काँग्रेस चे पदाधिकारी,आणि समस्त कोरपना नगरीतील व तालुका परिसरातील जनतेने उपस्थित राहावे.
असे आव्हान तालुका काँग्रेस कमिटी, शहर कांग्रेस कमेटी,व अल्पसंख्याक यांनी केलेले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *