

⭕वेदप्रकाश मिश्रा यांचे व्याख्यानमालेत प्रतिपादन…..
………हेमके गुरूजी स्मृति प्रतिष्ठानाचा उपक्रम……. लोकदर्शन 👉मोहन भारती
वर्धा,(जि,,प्र,)
समाज चालविण्यासाठी मूल्यांची गरज असून जीवनात संपत्ती कमविण्यासाठी शिक्षण नसून जीवनासाठी शिक्षण आहे असे विचार कृष्णा आयुविॅज्ञान संस्था कराड चे कुलपती तथा दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था वर्धा चे प्र-कुलपती डाॅ वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले. हेमके गुरुजी स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. हेमके गुरुजी हे अतुलनीय होते परंतु त्यांनी अतुलनीयतेला लाथ मारून अनुकरण स्वीकारले म्हणून अनुकरणता कायम ठेवणे जीवनाची गरज आहे असेही पुढे डाॅ मिश्रा म्हणाले.
व्याख्यानमालेचे अध्यक्ष संत साहित्याचे गाढे अभ्यासक व विचारवंत डॉ.नारायण निकम तर प्रमुख उपस्थिती म्हणून संज्ञा गोवर्धन संस्था नागपूरचे विश्वस्त रवींद्र सावजी, लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गजानन कोटेवार ,अरविंद हेमके प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सुहासिनी हेमके-घुडे आदी मंचावर उपस्थित होते.
भोजनाने तात्पुरती तृप्ती होते तर शिक्षणाने समस्त जीवनाची तृप्ती होते हे संस्कार आहेत म्हणून माणूस हा जीवनात संस्काराने मोठा होतो असे विचार अध्यक्षीय भाषणात डॉ. निकम यांनी व्यक्त केले
गुरुजींचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे सचिव अजय भोयर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संध्या भगत त्यांनी केले तर आभार मोहन सोनुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी करीता नरेंद्र हेमके, राज धात्रक, संजय बारी, प्रवीण वास्कर,सुनील बारी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्रकाश भोयर,प्राचार्य डाॅ पुष्पा तायडे,प्रशांत देशमुख, मुरलीधर बेलखोडे, पुंडलिक नागतोडे, रविन्द्र कोठेकर, येऊलकर, निलेश डाहाके,विभा दाते,बोधनकर सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते,