ग्रामोदय संघ भद्रावतीचे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणार : – खासदार बाळू धानोरकर*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕दिल्ली येथे लघु सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट*

चंद्रपूर : ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योग च्या स्फूर्ती योजनेअंतर्गत टेराकोट्टा पॉटरी क्लस्टर चा १.८१ करोडचा प्रकल्प मंजूरी असून संबंधित मंत्रालयातून निधी अप्राप्त असल्याने हा मंजूर प्राप्त प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पाचा निधी त्वरित मिळावा तसेच प्रशिक्षण व संशोधन उत्कृष्टता केंद्राला ग्रामोद्योग संघात त्वरित मान्यता द्यावी म्हणून चंद्रपूर – वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांनी आज दिल्ली येथे सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली.

सद्यस्थितीत ग्रामोदय संघ भद्रावती येथे खादी व ग्रामोद्योग यांचे सहाय्याने प्रादेशिक कुंभारकाम प्रशिक्षण केंद्रात मातीकाम उद्योगाच्या विविध अभ्यासक्रमाचे नियमित प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहेत. उच्च तापमानाची भांडी (सिरॅमिक) मध्ये विविध उत्पादने, फ्लाय अ‍ॅशची उत्पादने जसे विटा, पेव्हर ब्लॉक, दारे- खिडक्यांच्या फ्रेम इत्यादी उद्योग सुरु आहेत.

भद्रावती शहरात ग्रामोदय संघात हा प्रलंबित प्रकल्प आल्यास येथील बेरोजगारांचा हाताला काम मिळणार आहे. या भागातील युवकांना काम मिळण्यासाठी खासदार बाळू धानोरकर नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यामुळे येत्या काळात देखील हा प्रकल्प सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने आज त्यांनी लघु सूक्ष्म व मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. मंत्री महोदयांनी देखील यावर सकारात्मक लवकरच तोडगा काढून हे दोन्ही प्रकल्प लवकर सुरु होणार असल्याचे सांगितले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *