

लोकदर्शन 👉मोहन भारती
.
*सोलापूर दिनांक :- ०७/१२/२०२१ :-* महाराष्ट्र राज्यात परत एकदा बंद केलेले ताडी (शिंदी) दुकाने परत चालू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्याचे प्रशासन विभाग करीत आहे. म्हणून महाराष्ट्र राज्य ताडी (शिंदी) दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने ताडी (शिंदी) दुकान विरोधी आंदोलन हाती घेतली आहे. या आंदोलना अंतर्गत स्वाक्षरी मोहिम अभियान लोधी गल्ली बेडरपुल येथे संघर्ष समितीच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखली घेण्यात आली. या मोहिमेस प्रंचड असा प्रतिसाद मिळाल्याचे कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य प्रशासन विभागाच्या वतीने राज्यात ताडी (शिंदी) दुकाने परत चालू करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यास विरोध करण्यासाठी ताडी (शिंदी) दुकान विरोधी संघर्ष समिती व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विविध आंदोलने करण्यात येत आहे. त्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शहरातील विभाग भागात स्वाक्षरी अभियान घेण्यात येत आहे. दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी लोधी गल्ली बेडरपूल येते स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अभियानास मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळाले. यावेळी संघर्ष समितीचे निमंत्रक, कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी ताडी (शिंदी) दुकाने चालू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्रशासनाचा निषेध करून सर्व जनतेला आपल्या स्वाक्षरी करून पाठिंबा नोंदवा असे आव्हान केले. आणि एक जुटीने प्रशासनाच्या या अहवानाला हाणून पाडू या असेही आवाहन केले. या अभियानास संजीव शेट्टी, गणेश म्हंता, रमेश चिलवेरी, नागार्जुन कुसूरकर, मन्नुसिंग बाबावाले, मिराबाई लच्छुवाले, भरत पटपटवाले, सचिन चौधरी, सतिश गुडेवाले, मसुद अंबेवाले व लोधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
============================
*फोटो मॅटर :- दक्षिण सदर बजार लोधी गल्ली येते ताडी (शिंदी) दुकान विरोधी संघर्ष समितीच्या वतीने ताडी (शिंदी) दुकाने बंद व्हावे म्हणून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), सिताराम गाडीवाले, मसुद अंबेवाले, गणेश म्हंता, मन्नुसिंग बाबावाले व नागरीक बंधू- भगिनी दिसत आहेत.*