

By : Mohan Bharti
विश्वरत्न,क्रांतीसुर्य, ज्ञानवंत, ज्ञानाचा अथांग सागर , राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती च्या राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभागातर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा व त्यांनी केलेल्या समाजसुधारणेचा आढावा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य यांनी सर्वांसमोर मांडला. यांच्या मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य सदोदित या विश्वाला ऊर्जा व प्रेरणा देणारे आहेत. खऱ्या अर्थाने आजच्या घडीला माणसाच्या व विश्वाच्या विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वांगीण विचार व ज्ञान माणसास हितकारक आहेत. त्यांचे विचार अंगीकारून जगात शांतता व माणुसकी प्रस्थापित करू शकतो. असे प्रतिपादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयीन प्रा. राऊत, मुंडे, पानघाटे, देशमुख, लांडगे, साबळे, तेलंग, मस्कले, मंगाम तसेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.