लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळ यांच्या वतीने नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या उद्देशाने “जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा जनता दरबार शुक्रवार, दि. २९ मे २०२६ रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय, जिवती येथे पार पडणार आहे.
या उपक्रमामध्ये नागरिकांना आपल्या विविध समस्या, तक्रारी तसेच निवेदने थेट आमदारांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. “आपली समस्या, आमदाराची जबाबदारी” आणि “आपली सेवा, हेच आमचे कर्तव्य” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवरावदादा भोंगळ यांनी केले आहे.





