एकत्र कुटुंब पद्धती आणि वयोवृद्ध

 

By : Bhushan Madke

भारतीय संस्कृती ही जगात सर्वात जास्त समृध्द आणि विविधतेने नटलेली आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांच्या अनुकरण करण्याच्या नादात आपण आपल्याच पायावर दगड मारून घेतो आहे हेच आपल्या लक्षात येत नाही हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये प्रत्येक घटकाचा विचार केलेला आपल्याला दिसून येईल. सजीव घटक तर आहेतच परंतु निर्जीव बाबी सुद्धा विचारात घेऊन त्यांना मूर्त स्वरूप देण्याचा आणि त्यांना आपल्या आयुष्यात आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केला गेला. परंतु कालौघात नंतर मात्र बऱ्याच बाबी अलगद बाजूला केल्या गेल्या तर काहींना सोयीस्कररीत्या दूर सारले गेले. निर्जीव वस्तूत पाहिला जाणारा आपलेपणा तर दूरच परंतु आपलीच माणसे जेंव्हा नकोशी वाटू लागतात तेंव्हा त्या माणसात येणारा निर्जीवपणा त्यांना कोणत्या निराशेच्या गर्तेत घेऊन जात असेल. ज्यांना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले त्यांच्याकडूनच जेव्हा अहवेलणा होते तेंव्हा त्यांना जगणे नकोसे होऊन जाते.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असताना घरातील मुख्य कर्त्याच्या हातात सर्व कारभार असायचा तर निर्णय हे घरातील वयोवृद्ध व्यक्तींना विचारूनच घेतले जात. त्यामुळे अनुभवाने घेतले गेलेले निर्णय शक्यतो जास्त चुकत नसतं. घरातील वयोवृद्ध व्यक्ती अनुभवाने श्रीमंत तर असेच परंतु त्यामुळे घराला एकप्रकारची खंबीरता भेटत असे. कालौघात या एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस येऊन छोट्या कुटुंबपद्धती कडे लोकांचा कल वाढला आणि यामुळेच बऱ्याच घरातील वयोवृद्ध व्यक्तींना आपले जीवन म्हणजे नरकासम वाटू लागले.
त्यांना असे का वाटत असेल? त्यांच्या मनात नेमके काय चालू असते. याचा हा थोडक्यात मागोवा.
१) घरात घेतले जाणारे निर्णय त्यांच्या अपरोक्ष घेणे. त्यांचा विचार न करणे.
२) स्वयंपाक करताना त्यांच्या आवडीचा विचार न करणे.
३) घरात वावरत असताना त्यांना लक्षात न घेणे.
४) घरात चर्चा चालू असताना त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देणे.
५) त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे.
६) त्यांचा छोट्या छोट्या चुकांवर सतत बोट ठेवणे.
अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे त्यांना नैराश्य येऊ शकते.
आणि आपण तरुणांनीच(मुलामुलींनी) या बाबी योग्य समजाऊन घेऊन त्यांना योग्य न्याय दिला पाहिजे आणि त्यांना घरातच योग्य तो मान सन्मान दिला पाहिजे.
अहो त्यांना हवे असते तरी काय हो. आपल्याकडून थोडेसे गोड शब्द आणि फक्त त्यांची काळजी.
( हा काही बाबतीत काही वयोवृद्ध काही कारणांमुळे मानसिकदृष्ट्या कार्यक्षम नसतात, त्यांचे आजार, त्यांचा स्वभाव असे अनेक पैलू असतात जे त्यांना चिडचिडेपणा आणतात)
आपण काही बाबी समजून घेऊ की जेणेकरून आपण त्यांना थोडा तरी समजावून घेण्याचा प्रयत्न करू.
१) जरी आपल्याला त्यांचा निर्णय पटला नाही तरी त्यांचे ही मत विचारात घ्या जेणेकरून त्यांनाही त्यांचा अभिमान वाटेल. मागावून नंतर तुमच्या मनानुसार वागा.
२) त्यांच्या जेवणात आठवड्यातून दोन तीनदा त्यांचे आवडीचे पदार्थ बनवा.
३) सकाळी कामावर जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर कटाक्षाने त्यांच्याशी दोन शब्द आपुलकीने बोलून ५ १० मिनिटे त्यांच्यासोबत घालवा.
४) काही चर्चा चालू असताना त्याने मत अवश्य विचारात घ्या.
५) त्यांचे औषधपाणी आणि पथ्य अवश्य लक्षात ठेवा.
६) लक्षात असू द्या की म्हातारपण हे दुसरं बालपणच असते त्यामुळे त्यांच्या छोट्या छोट्या चुका दुर्लक्षित करा.
मुलांना जन्म देऊन त्यांना योग्य आकार देण्यापासून त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडविताना केलेले प्रयत्न आणि नंतर त्यांनीच केलेला दुस्वास किती भयंकर नैराश्य देतो याची जाणीव ज्यावेळी आपली मुले आपल्याला तशी वागणूक देतील तेंव्हाच होते.
त्यांना वागणूक देताना फक्त त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट आठवून पाहा. आणि आपण पुढल्या पिढीसाठी काय देत आहोत याची पण जाणीव ठेवा.

धन्यवाद

भुषण कौशल्या लक्ष्मण मडके

#व्हॉट्सअप८२०८२१४१७९

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *