भाजपाच्या दणक्याने, घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू.

*
लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

⭕*ग्रामीण रुग्णालय हे भाजपाने मंजूर केले. कॉंग्रेसने श्रेय घेऊ नये, पुरावा असल्यास सादर करावा- भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे*

*⭕आयत्या बिळावर नागोबा ही स्थानिक काँग्रेसची जुनी सवय!*

माननीय आमदार महोदयांनी मागणी केल्यानुसार राज्यामध्ये आरोग्य संस्थाचा पुर्ववत आराखडा तयार करण्यात येतो. त्याअनुषंगाने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व स्थानिक माजी आ. नानाभाऊ श्यामकुळे यांनी घुग्घुस येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली होती.
त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने सन 2014 रोजी जो 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापन पूर्वक आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्यामध्ये घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. 24 ऑक्टोबर 2018 रोजी शासनाकडून घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. मंजुरी नंतर सन 2019 च्या महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पात राज्याचे माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयास निधी मंजूर केला. त्यानंतर जागेचा शोध घेण्यात आला व शेवटी त्याच ठिकाणी इमारत बनविण्याचा निर्णय करण्यात आला. घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाच्या निर्माण कार्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू असताना सन 2019 मध्ये जेव्हा निविदा काढायची वेळ आली, तेव्हा महाराष्ट्रातील जनमताचा अनादर करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून सर्व निविदा बंद केल्या आणि दोन वर्षांनी ही बंदी उठविली.
घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाची अर्थसंकल्पीय प्रशासकीय मंजुरी ही भाजपा सरकारच्या काळातील आहे. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी हे रुग्णालय आम्ही मंजूर केले असे म्हणणे ही हास्यास्पद असून आयत्या बिळावर नागोबा ही काँग्रेसी नेत्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळे भाजपाने केलेल्या विकासकामांचे श्रेय काँग्रेसच्या नेत्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेसचे स्थानिक नेते म्हणायचे, बसस्थानक बांधणाऱ्यांना ग्रामीण रुग्णालय दिसले नाही का? तर वस्तुस्थितीत घुग्घुस येथील बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय, पाणी पुरवठा योजना, सिमेंट रस्ते, नाल्या, हायमास्ट लाईट, शुद्ध पाण्याचे आरो मशीन, दहा बगीचे, स्मशान भूमी, धार्मिक स्थळे अशी अनेकानेक विकासकामे भाजपानेच केली आहे.

घुग्घुस ग्रामीण रुग्णालयाचे सुरु असलेले काम मागील 23 दिवसापासून बंद होते, याविरोधात भाजपाने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेताच शासन प्रशासनाला जाग आली आणि आता कामास सुरुवात करण्यात येत आहे.
काँग्रेस नेत्यांनी गावात आधी विकासकामे खेचून आणावी व त्याचे खुशाल श्रेय घ्यावे. परंतु भाजपा सरकारच्या काळातील विकासकामांवर श्रेय लाटण्याचे लाजिरवाणे प्रकार बंद करावे असे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *