पंचायत समिती राजुरा येथे दिवाळी फराळ चे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕दिवांशी महिला बचतगट कळमना चा पुढाकार.

राजुरा :– महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती अभियान पुरस्कृत दिवांशी महिला बचत गट कळमना (उमेद) अंतर्गत पंचायत समिती राजुरा येथे दिवाळी फराळ आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती मुमताज जावेद यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना कळमना येथील महिला बचतगटाने पुढाकार घेऊन राजुरा येथे महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे दिवाळी फराळ स्टाल लावून शहरातील नागरिकांना दिवाळी फराळ खरेदी ची एक नामी संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे अनेकांनी त्यांच्या या उपक्रमांला भरभरून दाद दिली.
या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून उपसभापती मंगेश गुरुनुले, सरपंच तथा काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई तर प्रमुख अतिथी म्हणून उमेद च्या पाडवी मॅडम, कोगरे मॅडम, धोटे सर, देवांशी बचतगटाच्या महिला सुचीता धांडे, वैशाली आस्वले, स्मिता आस्वले, कविता इदे, मनिषा चिंचोलकर, संगीता आस्वले, मनिषा धांडे, मनीषा आस्वले, आत्राम ताई यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here