खिर्डी येथे लोकसहभागातून बांधला वनराई बंधारा

By : Mohan Bharti

गडचांदूर : येथून जवळच असलेल्या खिर्डी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा शेतकऱ्यांसाठी बांधला आहेत, रब्बी हंगामातील पिकासाठी हा बंधारा वरदान ठरेल असे मत तलाठी अन्सारी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ग्राम पंचायत खिर्डी च्या ग्रामसेविका उईके मॅडम,संगणक परिचालक दीपक ढवस, शिपाई अजय पिंपळकर,सहाय्यक शिक्षक किनाके,अंगणवाडी सेविका वैशाली तोडासे, अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे अरविंद बावणे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धनराज मालेकर, सदस्य सुनील तुराणकर,गावकरी, विद्यार्थी, उपस्थित होते. या वनराई बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *