

By : Mohan Bharti
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण.
राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या जनसंपर्क कार्यालय राजुरा येथे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. चंद्रपूर तर्फे शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर उपचारा करीता तीन लाभार्थी कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. या तिन्ही लाभार्थींना आमदार सुभाष धोटे व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
यात राजुरा येथील मंगेश बोरकुटे, लखमापूर येथील गंगाधर बापुजी पोतराजे, सवलहिरा येथील मोहन देवराव जेऊरकर यांना शेतकरी कल्याण निधी अंतर्गत कॅन्सर वरील वैद्यकीय उपचारा करीता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. चंद्रपूर तर्फे रूपये ३० हजार रुपयाची अर्थिक मदत मंजूर करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्या. चंद्रपूर चे अध्यक्ष संतोष रावत, प्रशासकीय अधिकारी केशव बोढे यासह लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.