मोदी सरकारच्या महागाई विरोधात राजुरा काँग्रेसचे धरणे आंदोलन

लोकदर्शन 👉 मोहन भारती


राजुरा :– अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या निर्देशानुसार लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस च्या वतीने पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस, खाद्यतेलासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वारेमाप दरवाढ करून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची लूटमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई मुक्त भारत हे ब्रीद घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की पेट्रोल, डिझेल, एलपिजी गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दररोज होणारी दरवाढ आणि महागाईने सामान्य जनतेचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने ही दरवाढ तातडीने थांबवून बेसुमार केलेली दरवाढ कमी करावी अन्यथा जनता या सरकारला धडा शिकविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. या प्रसंगी अनेक नेत्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकार पुरस्कृत महागाई चा निषेध केला. धरणे आंदोलना नंतर केंद्र सरकारने महागाई कमी करून गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार हरिष गाडे यांच्या माध्यमातून भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.
या प्रसंगी या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कविता उपरे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्णेवार, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, माजी नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, आनंद दासरी, माजी नगरसेविका दिपा करमनकर, वज्रमाला बतकमवार, गीता रोहणे, माजी सभापती सदस्य कुंदा जेणेकर, निर्मला कुडमेथे, माजी प स सदस्य तुकाराम मानुसमारे, माजी उपसभापती मंगेश गुरनुले, आत्माचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष गटलेवर, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, इंटक चे कामगार नेते शंकर दास, नागेश मेदार, राजुरा काँग्रेसचे कार्याध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, प्रभाकर येरणे, अविनाश जेनेकर, प्रणय लांडे, उमेश गोरे, अॅड. अरूण धोटे, अॅड चंद्रशेखर चांदेकर, अॅड मारोती कुरवटकर, अॅड. रामभाऊ देवईकर, शिवराम लांडे, विकास देवाळकर, रामभाऊ ढुमने, अमित टेकाम, राजाराम येल्ला, अनंता एकडे, ब्रिजेस जंगिडवार, जगदीश बुटले, कोमल पुसाटे, श्रीधर रावला, राजेश आवनुरी, श्याम सिंगाराव, लहू चहारे, कवडु सातपुते, पंढरी चंन्ने, इर्शाद शेख, आकेश चोथले, धनराज अवघान, पुनम गिरसावळे, ज्योती शेंडे, निता बानकर यासह तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती व जमाती विभाग काँग्रेस, अल्पसंख्यक विभाग काँग्रेस, ओबीसी काँग्रेस, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *