Home
Home सामाजिक ” वालुर ग्रामपंचायतला घंटा गाडिचे लोकार्पण” लोकदर्शन

” वालुर ग्रामपंचायतला घंटा गाडिचे लोकार्पण” लोकदर्शन

वालुर/ प्रतिनिधी 👉 महादेव गिरी

वालुर येथील ग्रामपंचायत कार्यालयालयाच्या वतीने नवीन दुसऱ्या घंटा गाडिचा लोकार्पण सोहळा दि.4 एप्रिल सोमवार रोजी थाटात पार पडला.
यावेळी सरपंच संजय साडेगावकर, उपसरपंच गणेशराव मुंढे,ईसमाईल अनसारी,सुरेंद्र तोष्णीवाल,ग्रामपंचायत सदस्य रामराव बोडखे, रमेश धापसे,राजेश साडेगावकर , समर शेख ,प्रभाकर फरकांडे, नारायण अष्टकर, गोपाळ थोरात ग्रामपंचायत कर्मचारी ऋषी वाघमारे, काशिनाथ जिवणे , विष्णु राऊत व ग्रामस्थ आदिंची यावेळी उपस्थिती होती.
वालुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला पुर्वीची एक घंटागाडी उपलब्ध होती.परंतु वालुर येथील वाढत्या लोकसंखेमुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणुन सरपंच संजय साडेगावकर यांनी 14 व्या वित्त आयोगातुन ग्रामपंचायत कार्यालयाला दुसरी एक नविन घंटागाडी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वालुर येथील नागरीकांची गैरसोय होणार नसल्याने नागरीकात आनंंदाचे वातावरण निर्माण होऊन ,सरपंच संजय साडेगावकर यांनी नवीन दुसरी घंटागाडी उपलब्ध करून दिल्याने नागरीकांच्या वतीने आभार व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here