बाखर्डी येथे व्यायामशाळा आणि ओपन जीमचे लोकार्पण.

लोकदर्शन 👉मोहन भारती

गडचांदूर–
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ग्रामपंचायत बाखर्डी येथे व्यायामशाळा आणि ओपन जीमचे लोकार्पण पार पडले. ग्रामपंचायत बाखर्डी येथील पदाधिकारी आणि नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे गावात व्यायामशाळा आणि ओपन जीमची मागणी केली होती याची दखल घेऊन आमदार सुभाष धोटे यांनी येथे व्यामशाळेसाठी ७ लक्ष रूपयाचे साहित्य आणि खुल्या जागेत ओपन जिमचे ७ लक्ष रुपयाचे साहित्य जिल्हा क्रीडा विभाग अंतर्गत निधीतून उपलब्ध करून दिले. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, विकासात्मक उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य असणार आहे.
या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थीपे, सरपंच अल्काताई पायपरे, प्रा. आशिष दरेकर, कोरपना युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे, सं. गां. नि. योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, सुरेश पा. मालेकर, डॉ. हर्षानंद हिरदेवे, उपसरपंच अंजनाबाई टेकाम, वरोडाचे सरपंच वनमाला कातकर, तळोधी चे उपसरपंच राजू चातुरकर, गणेश तुराणाकर, योगेश गोखरे, सुधीर थिपे, श्रीकांत वाघमारे, रुकमाबाई कुळमेथे, विनाबाई बादुरकर, शुभम उरकुंडे, गणेश आवरी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश लोखंडे यांनी केले. संचालन योगेश बुचुंडे यांनी तर आभार विवेक बुचुंडे यांनी मानले. कार्यक्रमाला बाखर्डी येथील रहिवासी नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *