“वालुर येथे ठिक ठिकाणी लसीकरणाच्या कँपचे यशस्वी आयोजन”

वालुर/प्रतिनिधी 👉 महादेव गिरी

वालुर येथे आज दि. 7 आँकटोंबर गुरुवार रोजी एकूण सात ठिकाणी वालुर येथील सर्व नागरीकांचे लसिकरण व्हावे म्हणून वालुर येथील सरपंच संजयजी साडेगावकर व आरोग्य विभाग कटाकक्षाने दक्ष असुन असाच विक्रमी लसीकरणाचा कँमप दि. 27 सप्टेंबर सोमवारी रोजी सरपंच संजयजी साडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या लसीकरण मोहिमेमध्ये विक्रमी एकाच दिवशी लसिकरण करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने वालुर येथील एकही नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरणाशिवाय राहु नये म्हणून दि.7 आँकटोंबर गुरुवार रोजी एकुण सात ठिकाणी लसिकरणाचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरणाचे उदघाटन वालुर येथील माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्यां सौ.महानंदा संजय साडेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रषणकुमार चौधरी, आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे, समुदाय अधिकारी मिर्जा बेग, जान्हवी आव्हाड, आरोग्य सहाय्यक भालचंद्र देशमुख, वसंत पवार, आरोग्य सेवक कोंडिंबा गोरे, आदिंची उपस्थिती होती.
या लसिकरण मोहिमेत एकुण 254 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. या लसिकरणासाठी राजेश साडेगावकर, नागेश साडेगावकर, गोपाळ थोरात, नारायण आष्टकर, गणेश घाटुळ व इतरांनी परीश्रम घेतले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *