आरसीएच व जीआय. अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील 56 अधिकारी व कर्मचा-यांना मनपाच्‍या आस्‍थापनेवर सरळसेवेत सामावून घ्यावे : आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर


🔸*आ. मुनगंटीवार यांनी घेतली नगरविकास विभागाच्या अधिका-यांसह आढावा बैठक*

प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रम फेज २ आरसीएच व जीआय. अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील मानधन तसेच वेतनश्रेणी तत्‍वावर कार्यरत असलेल्‍या एकूण ५६ अधिकारी व कर्मचा-यांना चंद्रपूर मनपाच्‍या आस्‍थापनेवर सरळसेवेत सामावून घेण्‍यात यावे असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

दिनांक ५ ऑक्‍टोबर २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे आयोजित बैठकीत आ. मुनगंटीवार यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीला नगरविकास विभागाचे उपसचिव श्री. मोघे, उपसचिव श्रीमती हम्‍पय्या, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्‍त राजेश मोहीते, कार्यासन अधिकारी धनंजय भगत, शहर कार्यक्रम व्‍यवस्‍थापक नरेंद्र जनबंधू, शरद नागोसे, प्रतिश अलोणे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. या बैठकीत सदर विषयाबाबत सविस्‍तर चर्चा झाली.

प्रजनन व बाल आरोगय कार्यक्रम फेज-२ आरसीएच ही केंद्र शासनाची योजना सन २००६ पासून सर्व महानगरपालिकेमध्‍ये कार्यरत असल्‍याने तसेच सदरची योजना ही राज्‍यात सर्वच महानगरपालिकेमध्‍ये समायोजन होत असल्‍याने, चंद्रपूर मनपातील सदर योजनेतील कार्यरत सर्व ३८ अधिकारी व कर्मचारी यांनी चंद्रपूर मनपाच्‍या आस्‍थापनेवर सरळसेवेत सामावून घेण्‍यासाठी सद्यस्थितीत कार्यरत ३८ पदांपैकी ११ पदे ही प्रथम मनपाच्‍या आकृतीबंधानुसार, आरोग्‍य विभागाकरीता मंजुर असलेल्‍या पदांवर समायोजन करण्‍यात यावे तसेच उर्वरीत २७ पदे त्जसे शहर कार्यक्रम व्‍यवस्‍थापक, लेखापाल, पीएचएन, एएनएम या पदांचा समावेश नव्‍याने चंद्रपूर मनपाच्‍या आस्‍थापनेवर आकृतीबंधामध्‍ये नव्‍याने पदनिर्मिती करून तसेच सदर पदांना शासनाकडून मंजूर घेऊन सदर २७ अधिकारी तथा कर्मचारी यांना चंद्रपूर मनपाच्‍या आस्‍थापनेवर सरळसेवेत सामावून घेण्‍यास सर्वानुमते ठरविण्‍यात आलेत तसेच उपसचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना त्‍यांचे कार्यालयामार्फत सदर पदांसाठीचे शासन निर्णय चंद्रपूर मनपास त्‍वरीत निर्गमीत करण्‍यासंबंधी निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

जीआयए अंतर्गत कार्यरत १८ अधिकारी तथा कर्मचारी केंद्र शासनाची योजना सन १९८५ पासुन चंद्रपूर नगरपरिषद अस्‍तीत्‍वात असतांना तेथील अधिकारी व कर्मचारी आजपावेतो चंद्रपूर मनपाच्‍या आरोग्‍य विभागात कार्यरत आहेत. सदर कर्मचारी हे बऱ्याच कालावधीपासुन कार्यरत असल्‍यामुळे तसेच त्‍यांना वेतनश्रेणी कार्यरत असल्‍यामुळे व मा. उच्‍च न्‍यायालय यांचे आदेशान्‍वये, त्‍यांना सहावा वेतन आयोग लागू असल्‍याने आयुक्‍त राजेश मोहिते यांनी सदर जीआयए मधील कार्यरत १८ अधिकारी, कर्मचारी यांना चंद्रपूर मनपाने आस्‍थापनेवर सरळसेवेत समावून घेणे आवश्‍यक असल्‍याचे सुचविले.
यांवर सविस्‍तर चर्चा करून, नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई येथील अधिकारी यांनी सदर अधिकारी व कर्मचारी यांना मनपाच्‍या आस्‍थापनेवर सामावून घेण्‍याकरिता नव्‍याने पदनिर्मिती करून शासनास प्रस्‍ताव सादर करून सदर योजनेअंतर्गत कार्यरत एकूण १८ अधिकारी व कर्मचारी यांचे पदांचे शासनाकडून मंजुरी घेऊन जीआए योजनेची सद्यस्थिती कार्यरत कर्मचारी यांना मनपाच्‍या आस्‍थापनेवर सामावून घेण्‍याचे सर्वानुमते ठरविण्‍यात आले .
तसेच उपसचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना त्‍यांचे कार्यालयामार्फत सदर पदांसाठीचे शासन निर्णय चंद्रपूर मनपास त्‍वरीत निर्गमीत करण्‍यासंबंधी आदेश दिलेत. याबाबतची कार्यवाही जलदगतीने करावी व हा प्रश्न सकारात्मकरित्या निकाली काढावा असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *