

लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवाब योजनाच्या वतीने पिंपळगाव येथे एक दिवसीय हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते
शिबीराचे उद्घाटन प्रतिष्ठित नागरिक खुशाल पाटील गोहोकार यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक गोरे,विलास पाटील ठाकरे,प्राचार्य रामकृष्ण पटले,प्रा, चेतन वानखडे,होते
शिबिरात 200 गावकऱ्यांनी नोंदणी करुन हिमोग्लोबिन व रक्तगट तपासून घेतले,
शिबिराच्या यशस्वी ते साठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ, संदीप घोडीले, डॉ, उत्कर्ष मुन,प्रा, चेतन वानखडे यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले,
कार्यक्रमा चे प्रास्ताविक प्राचार्य रामकृष्ण पटले यांनी केले, संचालन प्रा, पवन चटारे,यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ, संदीप घोडीले यांनी केले,
शिबिरात सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक,गावकरी उपस्थित होते,