चिखली बु. येथे आमदार सुभाष धोटे यांची भेट.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


विज पडुन २५ बकऱ्या मृत्यू झाल्या प्रकरणी शेतकऱ्यांचे केले सांत्वन.

जिवती (ता.प्र) :– जिवती तालुक्यातील चिखली बु. येथे दिनांक ४ आॅक्टोबर रोजी अवकाडी पावस व विज पडुन येथील दोन शेतकरी व चार बकरी मालक यांचे प्रचंड नुकसान झाले. यात नागेश कोटनाके, कमलाबाई मेश्राम हे जखमी झाले असून दिवाकर मेश्राम, धर्माराव मेश्राम, नागेश मेश्राम आणि रामशाव कोटनाके या चार शेतकऱ्यांचे एकुण २५ बकऱ्या मृत्यू पावल्याने या सर्व शेतकऱ्यांवर संकट कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आमदार सुभाष धोटे यांनी येथे तातडीने भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन केले आणि सर्व प्रकारची शासकीय मदत शिघ्रतेने मिळवून देण्यासाठी तहसीलदार व अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या प्रसंगी माजी जि. प.सदस्य भिमराव पाटील मडावी, तहसीलदार गांगुर्डे, मंडळ अधिकारी, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव सिताराम मडावी, पोलीस पाटील भिमराव मेश्राम, सलीम शेख, भिकाराव आडे, आनंदराव पाटील जाधव, लालशाव मेश्राम, जंगु गेडाम, वासुदेव गेडाम, पंडु पवार, सिताराम मेश्राम यासह चिखली बु येथिल ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here