भाजपाच्या कार्यकाळात चंद्रपूर महानगराचा सर्वागिन विकास – हंसराज अहीर

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर।


🔸*विठ्ठल मंदीर प्रभागात सिमेंट काॅक्रीट रस्त्याचे हंसराज अहीर यांचेहस्ते भूमिपुजन*

चंद्रपूर:- भाजपाच्या कार्यकाळात चंद्रपूर महानगराचा सर्वांगीन विकास होत असुन प्रत्येक प्रभागात रस्त्याची, नाल्यांची कामे, स्वच्छतेच्या बाबतीत स्वयंपूर्णतः, पेयजल, दिवाबत्ती व अन्य नागरी सुविधा लोकांना प्रभाविपणे उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. पक्षाचे नगरसेवक सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून कार्य करीत असल्याने महानगराचा विकास गतीशिलतेने सुरू आहे. भाजप हा विकासाला, जनसुविधांना न्याय देणारा पक्ष असल्याचे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी विठ्ठल मंदीर प्रभाग क्रं.15 मध्ये मनपाच्या नगरोथ्थान निधी अंतर्गत प्रस्तावित सिमेंट काॅक्रीट रस्ता व बंदीस्त नाली बांधकामाच्या भूमिपुजन प्रसंगी केले.
*महात्मा गांधी व शास्त्राीजींना जयंतीदिनी आदरांजली*
विठ्ठल मंदीर वार्डातील सतशिल चैक ते टागोर शाळेपर्यंतच्या या रस्त्याचे भूमिपुजन दि. 02 आॅक्टोंबर रोजी अहीर यांच्या शुभहस्ते पार पडले. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्राी यांच्या जयंतीनिमित्त या महामानवांच्या प्रतिमेस माल्यांर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी पूढे बोलतांना हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्राी नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असुन सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या भूमिकेतून देशाचा विकास सुरू आहे. महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्रयासाठी अहिंसेच्या मार्गाने दिलेला लढा हा सर्वांकरीता प्रेरणा देणारा आहे. त्यांचे विचार व त्यांची कृती यातून नव्या पिढीने बोध घ्यावा असे सांगुन माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्राी यांनी देशाच्या विकासात दिलेले योगदान तसेच राष्ट्राच्या रक्षणाकरीता केलेले कार्य महान होते. संपूर्ण देश त्यांचा सदैव ऋणी आहे अशा शब्दात या दोन्ही महान सुपूत्रांचे स्मरण केले.
या कार्यक्रमास भाजपा नेते खुशाल बोंडे, नगरसेविका सौ. संगिता खांडेकर, विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, सुर्यकांत कुचनवार, संजय राजुरकर, राजु वैद्य, वामनराव काकडे, पुष्पा चैधरी, सुमन राजुरकर, माधुरी काळे, तारा मिटकर, रवि बनकर, विकास खांडेकर, सचिन कोतपल्लीवार, चंदा शेरकी, सागर चैधरी, दिपक बानकर, तेजस काळे, शरद डंबारे, चिन्मय पवार आदी प्रभृती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेश कोलावार यांनी केले तर राजेंद्र खांडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *