मोठी बातमी! ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरं खुली होणार; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मंदिरं उघडण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. ७ ऑक्टोबरला घटस्थापना आहे. त्यामुळेच प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं आजच घेतला. यानंतर भारतीय जनता पक्ष मंदिरं उघडण्यासाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच सरकारनं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here