

गडचांदूर : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,आसन खु.पं.स.कोरपना जि.चंद्रपूर येथील तुकाराम यादव धंदरे यांना मनूष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट ) चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला. तुकाराम धंदरे यांनी शाळेत राबविलेले शैक्षणिक उपक्रम,कोरोना काळातील विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान होऊ नये म्हणून राबविलेले आँनलाईन आँफलाईन उपक्रम,राष्ट्रिय व सामाजिक कार्य,नवोपक्रम ,शैक्षणिक साहित्य निर्मिती, कृतीसंशोधन, तज्ज्ञ मार्गदर्शक सांस्कृतिक स्पर्धत तालूका जिल्हास्तरावर मजल, नवरत्न दरबार इत्यादी कार्याबद्दल त्यांना शिक्षकदिनानिमीत्य पुरस्कार जाहीर करन्यात आला. पूरस्काराचे स्वरूप हे सन्मानचिन्ह ,गौरवपदक ,मानपञ ,महावस्ञ ,मानकरी बँच आणि मानाचा फेटा त्यांना घरपोच प्रदान केल्या जाईल. सन्मानप्राप्त शिक्षक तुकाराम धंदरे यांचे अभिनंदन विविध स्तरातून केल्या जात आहे. *तुकाराम धंदरे यांनी आपल्या यशाचे श्रेय हे पं.स.कोरपन्याचे गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे साहेब, गडचांदूर बिटाचे शि.वि.अ.मा.रविंद्र लामगे साहेब,आवाळपूर केंद्राचे कार्यतत्पर केंद्रप्रमुख मा.पंढरी मुसळे साहेब यांना दिले आहे.