तुरीला मिळतोय साडेसहा हजार दर

By : Shankar Tadas

कोरपना : तालुक्यात आता तुरीचे पीक हाती येत असून आज 5 जानेवारीला अधिकाधिक 6500 रुपये दर मिळत आहे.
नवी तूर सध्या बाजारात चांगला दर मिळवत आहे. 2 जानेवारीला वाशिम जिल्ह्यात ७४७० रुपयांपर्यंत दर मिळाला. शासनाचा तुरीचा हमीभाव ६ हजार ६०० रुपये आहे.
अकोल्यात तुरीची साडेसहाशे क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली होती. किमान पाच हजार ते कमाल ७४५० रुपयांदरम्यान दर होता. सरासरी ६९०० रुपयांचा दर तुरीला मिळाला होता. मात्र कोरपना तालुक्यात तुरीच्या भावात मोठी घसरण दिसून येत आहे. आर्द्रता पाहुन दर 6000 पर्यंतच मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *