लोकदर्शन👉 मोहन भारती
गडचांदूर- येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह म्हणाले शिक्षक हा समाजाचा आरसा आहे आणि म्हणून सामाजिक परिवर्तन मध्ये व समाजाच्या विकासामध्ये शिक्षकाचे महत्त्वाचे योगदान आहे. यावेळी प्रा.डॉ. हेमचंद्र दूधगवळी प्रा.डॉ. संजय गोरे, प्रा. डॉ.शरद बेलोरकर, प्रा. डॉ. माया मसराम, मुख्य लिपिक शशांक नामेवार इत्यादी मान्यवरांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ. राजेश गायधनी यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते