अंबुजा सिमेंट फाउंडेशन तर्फे उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक व स्वयंसेवक यांचा सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,
⭕कोरोना काळात शिक्षणाचे कार्य करणारे शिक्षक व स्वयंसेवक यांचा सत्कार.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यातील केंद्रप्रमुख यांचाही सत्कार
,,,,,,,,,,,,,,,,,
⭕अंबुजा सिमेट फाउंडेशन, उपरवाही यांचा स्तुत्य उपक्रम
,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,

अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांचे नाविण्यापूर्ण उपक्रम परिसरातील गावांसाठी सुरु आहेत. दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही येथे सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक व शिक्षणदान उपक्रमात कार्य करणारे स्वयंसेवक यांच्या कार्याची दखल घेवून जिल्ह्यातत सुरु असलेल्या मिशन गरुडशेप या कार्यक्रमाला गती देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक व शिक्षणदान उपक्रमात कार्य करणारे स्वयंसेवक यांना शाल श्रीफळ व मोमेंटो व प्रमाणपत्र देवून भव्य सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फले यांचे प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करण्यात आली. शिक्षकाचे तथा शिक्षणप्रेमीचे शॉल व श्रीफळ देवून नागरी सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबुजा सिमेंट कंपनीचे कमर्शियल हेड संजीवराव, प्रमुख अतिथी म्हणून अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे, पं.स.कोरपना येथील गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे, पं.स. राजुरा येथील गटशिक्षणाधिकारी संजय हेडावू, पं.स.जिवती येथील गटशिक्षणाधिकारी कोरडे, शिक्षण विस्तार अधिकारी सचिन मालवी, केंद्र प्रमुख विलास देवाळकर, शेषराव वानखेडे, नामदेव बावणे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर विशेष भर असावा आणि शाळाबाहय मुलांना शाळेत आणून शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवंत करण्यावर भर असावा तसेच युटयुब वरील डॉ. सुगाता मित्रा शिक्षण विषयक विचार यावर आपले असे मनोगत व्यक्त केले. रत्नाकर भेंडे यांनी कोरोना काळातील शिक्षण व मंगी (बु) गावाच्या भौतिक विकासात व शैक्षणिक कार्यात अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य होत असून विकास कार्यात मोठी मदत होत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

सर्व प्रथम शिक्षण दान उपक्रमात कार्य करणारे स्वयंसेवक यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मुर्ती शैला मडावी मंगी (बु), मनीषा मडावी सालेगुडा, मनीषा पेंदोर सोनापूर, वर्षा लेकलवार भेंडावी, देवुबाई सिडाम कारगाव (खु), फुलबाई सिडाम धनकदेवी, यांचा शाल श्रीफळ व मोमेंटो व प्रमाणपत्र देवून भव्य सत्कार करण्यात आला.

जिल्हयातील उत्कृष्ठ कार्य करणारे शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मुर्ती रत्नाकर भेंडे मंगी (बु), राजुरा, गिरीधर पानघाटे हरदोना (खु) राजुरा, विठठल बक्षी सोनापुर राजुरा, उमेश आडे उपरवाही कोरपना, अशोक गोरे पिंपळगाव कोरपना, क्रिष्णा गर्जे कुकुळसात कोरपना, धनराज सोनवणे भोयगाव कोरपना, वंदना वाटेकर चिंचाळा चंद्रपूर, चंद्रकांत धकाते वडधा वरोरा, गणेशा आसेकर चकलिखीतवाडा गोंडपिपरी, सोनाली ज्ञानवल कुकडहेटी सिंदेवाही, महेंद्र खोब्रागडे नाचनभाटी सिंदेवाही, प्रदिप बिलवणे कोसंबी माल नागभिड यांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देवून भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या नियोजन व आयोजन अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे कार्यक्रम समन्वयक सरोज अंबागडे आणि किशार हजारे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सुत्रसंचलन जि.प. उच्च प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथील विद्यार्थीनी कु. हर्षदा बोबडे यांनी मंगला उरकुडे यांचे मार्गदर्शनात केले. आभार कु. वसुंधरा पायघन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरोज अंबागडे, किशार हजारे व अंबुजा फाउंडेशन येथील स्वयंसेवक चमू यांनी यांनी मोलाचे सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *