गडचांदूर येथे कोविड लसीकरणाची सुरुवात

लोकदर्शन प्रतिनिधी : शिवाजी सेलोकर 

भाजपा गडचांदूर शहर च्या मागणीला यश

गडचांदूर – सम्पूर्ण देश्यात शासनाने कोरोना लसीकरण चालू केले असून प्रत्येक तालुका ठिकाणी सदरचे केंद्र सुरुवात करण्यात आले.त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्हातील कोरपना येथे सुद्धा लसीकरण केंद्र सुरू केले आहे.परन्तु गडचांदूर शहर हे कोरपना पासून 25 किमी अंतर असून तालुक्यातील सर्वात मोठे औधोगिक शहर आहे व 35 ते 40 हजाराहून अधिक लोकसंख्येचे शहर आहे तेव्हा येथील नागरिकांना कोरपना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोना लस घेणे शक्य नसल्याने गडचांदूर शहर भाजपा कडून दि ८/३/२०२१ ला मा जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर व मा शल्य चिकिस्तक अधिकारी चंद्रपूर यांना तालुका ग्रामीण रुग्णालया मार्फत निवेदन देऊन गडचांदूर शहर येथे कोरोना लसीकरण केंद्र चालू करण्याबाबतचे निवेदन दिले असता सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे दि १५/३/२०२१ पासून केंद्र सुरू करण्यात आले व ८१ नागरिकांनी त्याचा लाभ उचलला आहे.सदरचे केंद्र चालू केल्याबद्दल भाजपाचे वतीने त्यांचे आभार मानले आहे.
स्वतःची व परिवाराची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून आजही कोरोना लसीकरण केंद्रात काम करणारे ग्रामीण रुग्णालयाचे ड्रा प्रवीण गोणारे ,ग्रामीण तालुका आरोग्य सहाययक मिलिंद नळे.
डाटा ऑपरेटर गजानन राठोड,माधुरी लांडे,किरण कोळसे,
स्वेता दिवे,आचल देरगे,सुद्योजन धोंगरे यांचे भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे,अजीम बेग,प्रतीक सदनपवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *