

लोकदर्शन 👉- मोहन भारती
देशात शंभरी भरूनही पेट्रोलचे दर वाढतच आहेत.सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात आज फुकट पेट्रोल देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. फुकट पेट्रोलसाठी सुशीलकुमारांच्या रांगा लागल्या आहेत.
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आज 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे .यानिमित्ताने यशदा युवती फाउंडेशनच्यावतीने ४ सप्टेंबर रोजी सुशीलकुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर मोफत देण्यात येणार असल्याचं नगरसेविका व फाउंडेशनच्या संस्थापक फिरदोस पटेल यांनी जाहीर केलं होतं.
आज सकाळी नऊ पासूनच सुशील कुमार किंवा सुशील नाव असलेल्या व्यक्तींची गर्दी सुरू झाली. चक्क रांगा लागल्या.
◼️फुकट पेट्रोल स्कीम..
सुशीलकुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी ओळखीसाठी येताना सोबत आपले आधारकार्ड आणावयाचे आहे.त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार आहे.