

लोकदर्शन 👉 मोहन भारती
○राजुरा तालुका खैरे कुणबी समाज मंडळाचा पुढाकार.
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा पाचगाव येथील निवासी वासुदेव मारुती जुनघरे यांचा दिनांक १ जून रोजी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना पत्नी दोन मुली, एक मुलगा आणि वृद्ध वडील आहे. वडीलाच्या अकाली निधनाने पत्नी व लहानग्या मुलाचे छत्र हरपले. जुनघरे कुटुंबियांवर दुःखाचे फार मोठे संकट कोसळले. अशा संकटाच्या काळात आपल्या समाज बांधवांना मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. या जाणिवेतून राजुरा तालुका खैरे कुणबी समाज मंडळाच्यावतीने आज दिनांक २७ जून रोजी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मृतक वासुदेव जुनघरे यांच्या तिन्ही पाल्यांना शैक्षणिक साहित्य तथा पुढील शिक्षणाकरता सानुग्रह मदत निधी देण्यात आला.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष वासुदेवराव चापले, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, सचिव डॉ. चौकुंडे सर, विलास चापले, कुणाल कुडे, रामरतन चापले, एडव्होकेट मारोती कुरवटकर, पाचगाव येथील दशरथ भोयर, शंकर गोणेलवार यासह समाज बांधवांची प्रामुख्याने उपस्थिती होती.