संजय देवतळे यांच्या निधनाने सर्व सामान्यांचा आधार हरपला. — आमदार सुभाष धोटे.

 

दि 25/4/2021 ÷÷लोकदर्शन :– जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ४ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा त्यांनी सांभाळला होता. ते सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटनारे नेते होते. आमच्या सोबत त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. ते एक संयमी आणि अभ्यासू व्यक्तीमत्व होते. चंद्रपूर जिल्ह्य़ाच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने सर्व सामान्यांचा आधार हरपला आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या शोकसंदेशातून दिली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *