आदर्श समाजासाठी गांधी विचार अंगीकारा।।

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

 

महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

चंद्रपूर, ता. २ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच आज आपण कोरोना सारख्या महामारीचा सामना करतोय. कोरोना आल्यापासून सर्वाना स्वच्छतेचे महत्व कळले. रोगराईपासून दूर राहायचे असेल तर स्वच्छता असलीच पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे ही स्वच्छतेचे पुजारी होते. जर कोणी व्यक्ती स्वच्छ नसेल तर त्याचं स्वास्थ ही चांगली राहू शकत नाही, असे गांधीजी म्हणायचे. माणसाने चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वच्छ राहणे बंधनकारक आहेत. आदर्श समाजासाठी गांधी विचार अंगीकारा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी आपल्या संदेशात केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी (ता. २) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांची उपस्थिती होती. मनपा मुख्यालय आणि जटपूरा गेटस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आभिवादन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेतील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here