

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,🔸,गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार,,
गडचांदूर,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था ,मर्यादित, गडचांदूर ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली,
अध्यक्ष स्थानी पतसंस्था चे अध्यक्ष संजय झाडे होते,
प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या स्मिता चिताडे,प्राचार्य शरद जोगी, व साईनाथ मेश्राम, प्रभारी सचिव धनंजय गोरे,पतसंस्था चे सचिव प्रफुल्ल माहुरे,उपाध्यक्ष पद्माकर खैरे,कोषाध्यक्ष व्ही, जे,डाहूले,संचालक, सर्वश्री बी,एस, पत्तीवार,सुभाष खुजे, अनिल मडावी,स्वाती केळकर,भारती घोंगे,व्यवस्थापक प्रमोद काळे ,सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार,सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल कुमरे,होते,याप्रसंगी 10 वी 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला, तसेच सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बततुलवार,व सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल कुमरे यांचा सत्कार करण्यात आला,
पतसंस्था चे सचिव प्रफुल्ल माहुरे यांनी वार्षिक अहवाल सादर केला, जमा खर्च ला मंजुरी देण्यात आली,116 सदस्य संख्या असलेल्या पतसंस्था ला मागील वर्षी 1 करोड 99 लक्ष 3 हजार 355 रुपये निव्वळ नफा झाला आहे असे सांगितले,
सभेला महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर, सोनूर्ली, नांदगाव(सुर्याचा)महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते,
सभेचे प्रास्ताविक अनिल मडावी यांनी केले, संचालन पद्माकर खैरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद काळे यांनी केले,