प्राध्यापकांच्या विविध समस्या बाबत ना. उदय सामंत यांना गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स चे निवेदन

By : Mohan Bharti

राजुरा- प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी याकरिता गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन च्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना विविध समस्या व मागणीबाबत निवेदन देण्यात आले आहे. गोंडवाना विध्यापिठ गडचिरोलीच्या 10 व्या वर्धापन दिन व दशमनोत्सव सोहळा निमित्य ना.सामंत विद्यापीठात आज आले होते व यावेळी निवेदनातील विविध प्रश्नाबाबत ना.सामंत यांनी चर्चा केली व प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे संघटनेला आश्वासन दिले आहे. निवेदनामध्ये खालील मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे बिगर नेट-सेट प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नाविषयी सकारात्मक तोडगा काढून त्यांना प्रथम नियुक्ती दिनांकापासून कॅसचे लाभ देण्यात यावे व त्यांच्या पेन्शन बाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, सातव्या वेतन आयोगातील सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक या पदाच्या पदोन्नती करता प्लेसमेंटची देय तारीख ग्राह्य धरण्याबाबत , प्राध्यापकांना यूजीसीच्या निर्देशानुसार टेबल-4अ प्रमाणे नोशनल वेतनवाढ देण्यात यावी. सातव्या वेतन आयोगात एम.फिल व पी.एचडी च्या प्रोत्साहनपर आगाऊ वेतनवाढी सहित वेतन निश्चिती करण्याबाबत, एम. फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नती तसेच वेतनवाढीचा लाभ देण्याबाबत, 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्याबाबत, तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे अकॅडमीक स्टॉप कॉलेजची व सहसंचालक (उच्च शिक्षण) यांच्या कार्यालयाची स्थायी स्वरूपामध्ये निर्मिती करणे इत्यादी बाबत सविस्तर मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ.संजय गोरे, सचिव प्रा.डॉ. विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते, सहसचिव डॉ.प्रमोद बोधाने, विभाग समन्वयक डॉ.शरद बेलोरकर,विभाग समन्वयक डॉ.राजेंद्र गोरे, विभाग समन्वयक डॉ. दिनकर चौधरी,, डॉ.विठ्ठल ठावरी,प्रा.रुपेश कोल्हे,प्रा.अभय लाकडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी ना. उदय सामंत यांना उपरोक्त समस्या बाबतचे निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here