

लोकदर्शन–गडचांदूर शिवाजी सेलोकर
भारतीय जनता पक्ष गडचांदूर च्या वतीने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने दि.17सप्टेंबर ते2आँगस्ट या पंधरवाडयात विविध प्रकारची सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.
दि.2आँक्टोबरला म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष कार्यालयात माहात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार,पुष्पमाला घालून व विधिवत पुजन करन्यात आले. यानंतर मिरवणूक काढुन,हातात तीरंगा घेऊन ग्रामीण रूग्णालयात पोहोचले.
रूग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. यात जेष्ठनेते महादेवराव एकरे,शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,महामंत्री हरीश घोरे,नगरसेवक अरुण डोहे, रामसेवक मोरे,युवा नेते श्री निलेश ताजने, संदिप शेरकी,महेश घरोटे,कुणाल पारखी,कोंगरे,अजीम शेख, व रोहन काकडे युवा मोर्चा ता.अध्यक्ष ,व अनेक युवा कार्यकर्ते तसेच जिल्हा महिला आघाडी महामंत्री सौ.विजया लक्ष्मी डोहे,रंजना ताई मडावी व इतर महिला पदाधिकारी, युवा मोर्चा पदाधिकारी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते