‘सकाळ’चे नरेंद्र चोरे यांचा सत्कार

लोकदर्शन

नागपूर :
‘सकाळ’ परिवाराने प्रतिष्ठेच्या डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्काराने नरेंद्र चोरे यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्ताने नागपूरच्या सकाळ कार्यालयात झालेल्या छोटेखानी समारंभात महाराष्ट्राचे क्रीडा व पशूसंवर्धनमंत्री मा. सुनीलबाबू केदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ व आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याबद्दल चोरे यांनी सकाळच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक मा. संदीप भारंबे सर, सहयोगी संपादक मा. प्रमोद काळबांडे सर, जामकर सर, कोळमकर सर, तापस सर व माझ्यावर प्रेम करणारे शेळके सर, शैलेश आर्य यांच्यासह सर्वांचे आभार मानले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी सर व मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर सर व अन्य खेळाडू व प्रशिक्षक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here