महाराष्ट्रात पंचवीस नवे होस्टेल स्थापन करण्याचा संकल्प : प्रा. ज्ञानेश वाकुडकर 

By : Shankar Tadas

नागपूर :
गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारे आमचे कृतज्ञता वसतीगृह, (बुटीबोरी) नागपूर येथे आहे. सदर हॉस्टेल
एक एकर जागेमध्ये बुटीबोरी येथील फाईव्ह स्टार एमआयडीसी मधे आहे. याप्रमाणे राज्यात 25 हॉस्टेल संस्थेच्या माध्यमातून उभारली जाणार असल्याची माहिती प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी दिली आहे.

” प्रा. म. धों. उपलेंचवार सर यांच्या वरोरा, जि. चंद्रपूर येथील होस्टेलचे (आमच्या वेळचे EBC आणि आताचे ज्ञानदा) आम्ही माजी विद्यार्थी. तिथल्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेले हे आमचे नागपूरचे होस्टेल. समाजाचे ऋण फेडण्याचा हा अल्पसा प्रयत्न. म्हणून त्याचे नाव ‘कृतज्ञता!’ रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया, हे आमच्या संस्थेचे नाव !

आम्ही सरकारची मदत घेत नाही, घ्यायची नाही, हे पहिल्या दिवसापासून ठरलेले आमचे धोरण आहे. हितचिंतक आणि देश विदेशात पसरलेले आमचे माजी विद्यार्थी यांच्या मदतीवर हे चालविले जाते. आज सुमारे १०० विद्यार्थी इथे राहतात. एकूण २०० विद्यार्थी इथे राहू शकतात. कोरोना पासून संख्या कमी झाली. आमचे सचिव डॉ. दादाराव बनकर यांनी स्वतःला या कामात झोकून दिलेलं आहे. माजी जिल्हाधिकारी, आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे आणि इतर मान्यवर आमचे सदस्य आहेत.

आमच्या संस्थेचे हे २५वे – रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात अशीच सुमारे २५ होस्टेल्स येत्या काही वर्षांत सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतलेला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी दिली.
*****
ज्ञानेश वाकुडकर
संस्थापक अध्यक्ष,
रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष,
कृतज्ञता वसतीगृह, नागपूर (बुटीबोरी)

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *