*एकोडी येथील ३० युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश*

लोकदर्शन👉 मोहन भारती

*🔸कॉंग्रेसचे ‘गाव चलो अभियान’*

गडचांदूर –
आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियान’ एकोडी येथे संपन्न झाले. यावेळी गावातील ३० युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे घराघरात पोचविणे, नवीन कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाशी जोडणे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, युवकांना राजकारणाचे महत्व समजावून सांगणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे.
यावेळी अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे जेष्ठ नेते सुरेश पाटील मालेकर,गाव चलो अभियान चे समन्वयक आशिष देरकर,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश लोखंडे, निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर,युवक काँग्रेसचे विधानसभा महासचिव रोशन आस्वले, घनश्याम तुराणकार, दिपक पानघाटे,शुभम उरकुंडे, नाना जेणेकर, प्रमोद डाहाकी, गणेश जेणेकर, भास्कर कुंभे, राजू धोंगडे, मिन्नाथ मांडवकर, भिकाजी मिलमीले, सचिन मिलमीले, विजय गोरे, साईनाथ बोढे, नितीन मिलमीले व युवक, महिलांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सतीश बोढे तर प्रास्ताविक एकनाथ गोखरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here