पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी शाळांना संगणक संच द्यावा जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी.,

By : Mohan Bharti

गडचांदूर : चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पदवीधर आमदार ऍड. अभिजीत वंजारी यांची नागपूर येथे भेट घेतली. मुख्याध्यापकांना कोरोना काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्या सर्व समस्या मा. आमदार साहेब यांच्या समोर मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कथन केल्या व त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. आमदार. ऍड. अभिजित वंजारी यांनी त्या समजावून घेतल्या व त्या समस्या शासनस्तरावर मांडुन नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन मुख्याध्यापक संघाला दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना आमदार निधीतून संगणक तथा प्रिंटर देण्यासाठी विनंती करण्यात आली ती त्यांनी लगेच मान्य केली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष श्री मारोतराव खेडीकर चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री मधुकर चापले कोषाध्यक्ष श्री अरविंद राऊत तथा सहसचिव श्री दिपक बोकडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here