शेतकरी सल्हागार समिती अध्यक्षपदी तिरुपती उर्फ संतोष इंदूरवार यांची निवड.

By : Mohan Bharti

राजुरा  :– कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राजुरा तालुका शेतकरी सल्हागार समिती अध्यक्षपदी तिरुपती उर्फ संतोष इंदूरवार यांची निवड करण्यात आली. संतोष इंदुरवार हे पाचगाव चे माजी उपसरपंच तथा तमुस चे माजी अध्यक्ष राहीले आहेत. या समितीच्या सदस्यपदी जि प सदस्य मेघा दिलीप नलगे, जि प सदस्य सुनील उरकुडे, नंदकिशोर वाढई, रामभाऊ ढुमने, मनिषा धनराज देवाळकर, संगिता अनिल धोटे, जयश्री पांढरे, लहू चहारे, हनुमंत चुडीवार, अंबादास भोयर, सुरेश इसनकर, सुनीता सुरेश वऱ्हाडे, वर्षा विजय पिंगे, संदीप महादेव घोटेकर, सुधीर लांडे, वर्षा तावाडे, श्यामराव कोटनाके, मनोहर रणदिवे, सुरेखा सोयाम, चिरूताई ताजने, विकास कुमरे इत्यादी सदस्य आहेत.
राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करीता, सहाय्य (आत्मा) योजनेतील तालुका स्तरावर विविध समित्या स्थापन करून शेतकरी सल्लागार समितीची पुनर्रचना करणेसाठी तालुक्यात कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या शेतकऱ्यांची समितीमध्ये निवड करण्यात येते. यामाध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्न लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येतात. नवनियुक्त अध्यक्ष तिरुपती ऊर्फ संतोष इंदुरवर आणि सर्व सदस्यांचे आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, मारोती बोढेकर, उपसभापती मंगेश गुरणुले, पं स तुकाराम मानुसमारे, विकास देवाडकर, कवडु सातपुते, इर्शाद शेख, यासह अनेकांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *