सिंधी येथे तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड प्रक्रियेत गोंधळ.

ग्रामसभेत दारु वाटुन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई ची ग्रामस्थांची मागणी.
लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा :– दि.13/09/2021ला ग्राम पंचायत सिंधी येथे ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या पुर्व संध्येला प्रणय साईनाथ झुरमुरे या व्यक्ती ला गावातील नागरिक आणि सभा अध्यक्ष शोभा रायपल्ले यांनी दारु वाटप करताना रंगेहात पकडून होमगार्ड कर्मचारी सूरेश दरेकर यांच्या ताब्यात देण्यात आले. त्या वेळी सभा अध्यक्षानी व सदस्यानी दारु वाटप करणाऱ्यांना अटक होत पर्यंत सभा 1.30 तास तहकुब केली. नंतर सहायक पोलिस निरीक्षक चव्हान यांनी सभास्थळी येऊन प्रणय झुरमुरे ला अटक केल्या नंतर सभा सुरळीत सुरू झाली परंतु सभा सुरू असताना महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष निवडीच्या वेळी काही लोकांनी मतदान मोजणाऱ्या कर्मचार्‍यांना मतमोजणी करताना अडथळा निर्माण करण्याचे काम केले. सभा अध्यक्षानी राजकुमार दामेलवार यांचे बाजुचे मतदान फेर मोजनी साठी ग्रामसेवकांना सांगितले असता काहींनी फेर मोजनी होऊ दिले नाही म्हणून त्या वेळी सभा अध्यक्षानी हा विषय घोषीत न करता समोरील विषयावर चर्चा करून सभा संपली असे जाहीर केले. तर उपस्थित झालेल्या गोंधळामुळे तमुस अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. सभेत दारु चे आमीष दाखवून गोंधळ घडवणार्‍यांवर पोलिस काय कारवाई करणार या कडे गावातील नागरिकांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here